नवी दिल्ली : नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून वाहनांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. फास्टॅग 2016 मध्ये लाँच झाला होता. यात टोल प्लाझामध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फी भरण्याची सुविधा आहे. फास्टॅग अनिवार्य झाल्यानंतर वाहनांना टोल प्लाझावर थांबावे लागणार नाही आणि टोल शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरले जाणार आहे.
गुरुवारी एका वर्च्युअल कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रोख पैसे भरण्यासाठी टोल प्लाझावर थांबवे लागत नसल्याने प्रवाशांना फास्टॅग खूप फायदेशीर ठरेल. यामुळे वाहन धारकांची वेळ आणि इंधनाचीही बचत होईल.
फास्टॅग 2016 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि चार बँकांनी एकत्रितपणे त्यावर्षी एक लाख टॅग जारी केले. त्यानंतर 2017 मध्ये सात लाख आणि 2018 मध्ये 34 लाख फास्टॅग जारी केले. मंत्रालयाने या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक जानेवारी, 2021 पेक्षा जुन्या वाहनांसाठी किंवा 1 डिसेंबर 2017 पूर्वी वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 नुसार 1 डिसेंबर 2017 पासून नवीन चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय वाहतुकीच्या वाहनांच्या फिटनेस प्रमाणपत्रासाठी संबंधित वाहनाचे फास्टॅग आवश्यक आहे. 1 ऑक्टोबर 2019 पासून राष्ट्रीय परवान्यांसह वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. नवीन थर्ड पार्टी विमा साठी कायदेशीर फास्टॅग देखील अनिवार्य केले गेले आहे. 1 एप्रिल 2021 पासून ही अंमलात येईल.
संबंधित बातमी :
भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार! जाणून घ्या सरकार कसे पैसे वसुल करणार
GPS technology For Toll | भारत टोलनाक्यांपासून मुक्त होणार! सरकार कसे पैसे वसुल करणार?