लखनऊ : उत्तरप्रदेशातील फारुखाबादमध्ये जिल्हा कारागृहात कैद्यांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला आहे. यात जेलमधील अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले आहेत. तसंच कैद्यांनी जेलमध्ये आग लावत मोठी दगडफेकही केली.
यूपीतील फारुखाबाद कारागृहातील कैद्यांना विविध गैरसोयींना सामोरं जावं लागतं. त्याला कंटाळून आक्रमक झालेल्या कैद्यांनी जेलच्या अधिकाऱ्यांवर हल्ला चढवत जेलचा ताबा घेतला. यात जेलचे मुख्य विकास अधिकारी, जेल अधीक्षक आणि काही पोलीस कर्मचारीही जखमी झाले. त्यांना तातडीनं लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
जेलमध्ये कैद्यांच्या हल्ल्यानंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरु केली आहे.