VIDEO : राष्ट्रगीत सुरु असताना फारुख अब्दुल्ला फोनवर व्यस्त!
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2016 05:44 PM (IST)
कोलकाता : नॅशनल कन्फरन्सचे वरिष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर भारताच्या राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. ममता बॅनर्जी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीतादरम्यान फारुख अब्दुल्ला फोनवर बोलत होते, असा आरोप आहे. ममता बॅनर्जी यांच्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीत सुरु असताना, फारुख अब्दुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, ते फोनवर बोलत होते. राष्ट्रगीत सुरु असताना अब्दुल्ला फोनवर बोलत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. https://twitter.com/ANI_news/status/736128937076498433 “मी राष्ट्रगीताचा आदर करतो आणि त्याचा कधीही अपमान करु शकत नाही. माध्यमं याचं भांडवल करुत असून, अतिशयोक्ती करुन दाखवत आहेत.”, असं फारुख अब्दुल्ला यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.