चंद्रीबाबू म्हणाले, “लोक पाप करत आहेत आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मंदिरात जात आहेत, प्रार्थना करत आहेत. ज्याप्रकारे समस्या वाढत आहेत आणि पाप वाढत आहेत, त्याच प्रमाणात लोकांची मंदिरातील संख्या वाढत आहे. हेच वास्तव आहे.”
“केवळ मंदिरंच नव्हे, लोक चर्च आणि मशिदींमध्येही जात आहेत. जर मंदिर, मशीद आणि चर्च नसते, तर लोक वेडे झाले असते.” असेही चंद्राबाबू म्हणाले.
“दारुविक्रीमध्ये घट झाल्याने राज्याच्या उत्त्पन्नातही घट झाली आहे. अनेकजण सबरीमालाच्या अय्यपा स्वामी मंदिरमधून दीक्षा घेतल्यानंतर 40 दिवस दारु सोडतात. यादरम्यान, दारु व्यवसायावर परिणाम होतो आणि विक्री कमी होते”, असेही चंद्राबाबू थट्टेत म्हणाले.