Farmers Protest दिल्लीतील सिंघू बॉर्डर भागात सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला दर दिवशी एखादी घटना एक नवं वळण देऊन जाते. यातच आता एका खासदारांनी आपल्यावर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी धक्काबुक्कीवजा हल्ला केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. काँग्रेस खासदार रवनीतसिंह बिट्टू यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबतची माहिती दिली.

Continues below advertisement

'एएनआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केंद्राच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत हे कायदे रद्द करण्याची मागणी करणाऱ्यासाठी दिल्लीत सध्या आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी गेलं असता तेथे उपस्थित शेतकरी आंदोलकांनी सिंह यांना रोखलं होतं. वृत्तसंस्थेच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

सदर घटनेबाबत माहिती देताना शेतकरी नेत्यांकडून बोलवण्यात आलेल्या बैठकीसाठीच आपण उपस्थिती लावण्यासाठी गेलो होतो, असं सिंह म्हणाले होते. ही या धक्काबुक्कीमध्ये त्यांची पगडीही खेचली गेल्याचा दावा सिंह यांनी केला. त्यामुळं धक्काबुक्कीचं स्वरूप गंभीर असल्याची बाब इथं उघड होत आहे.

Continues below advertisement

National Voters Day | मतदार म्हणून काय आहेत तुमचे अधिकार, जाणून घ्या मतदार दिनाचं महत्त्वं

सिंह यांच्या वाहनालाही बहादूर स्मारकापाशी नुकसान पोहोचवण्यात आलं. ते या ठिकाणी गुरजीत सिंह औजला आणि कुलबीर सिंह जीरा यांच्यासमवेत सहभागी होण्यासाठी पोहोचले होते.

रवनीत सिंह बिट्टू हे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत. ज्यांची 1995मध्ये हत्या करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून ते दिल्लीती जंतर मंतर येथे केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सदर हल्ला हा शस्त्रधारी व्यक्तींच्या जमावानं केला असून, तो सुनियोजिक होता असा खळबळजनक दावाही केला आहे.