Noida Farmer Protest : दिल्लीतील माहामाया भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मोठी गर्दी झाली आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा येथील शेतकऱ्यांनी हमीभावासाठी आंदोलन पुकारले आहे. बॅरिकेडिंग करत पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखलं आहे. शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत काढलेल्या या मोर्चामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जाली आहे. हमीभावासाठी शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. याआधीही शेतकऱ्यांनी दिल्ली जॅम केली होती. पण त्यावेळी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. दिल्लीच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
ऐंशीच्या दशकात दिल्ली, नोयडाजवळील दादरी भागात एनटीपीसीच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमीनी दिल्या होत्या. त्याचा योग्य मोबदला अजुनही मिळाला नाही. नोकरी देण्याचं आश्वासनही पूर्ण केलं नाही. सर्वांना सारखा मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. नोयडा अथॉरिटी 10 टक्के प्लॉट देणार होती. ते सुद्धा मिळाले नाहीत. अंसल बिल्डरने सुद्धा शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. साधारण 105 गावं, जवळपास 2200 कुटुंब प्रभावित झाली आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.
शेतकऱ्यांचे आरोप काय ?
NTPC चा मोबदला एकसमानता नाही
NTPC चा वेगवेगळा मोबदला दिला
नोकरी देण्याचं अश्वासन पूर्ण झालं नाही
नोएडा अथॉरिटीने 10% प्लॉट परत घेतले.
अंसल बिल्डरने शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही.
आणखी वाचा :
परीक्षेला निघालेल्या तीन भावंडांना चिरडले; दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेतून भीषण अपघात