मुंबई : कर्जमाफीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्यक्त केली आहे.


राज्यातील शेतकऱ्यांचा संप आणि मध्य प्रदेशाच्या मंदसौरमध्ये सहा शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर उर्जित पटेल यांनी हे विधान केलं आहे.

मुंबईत आज पत्रकार परिषदेत बोलताना आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसेल. शिवाय कर्जमाफीमुळे मागील दोन वर्षात वित्तीय तूट कमी करण्यासाठी जे प्रयत्न केले, ते वाया जातील."

कर्जमाफीसाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र मध्य प्रदेशातील आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

"परंतु कर्जमाफीचा निर्णय विचारपूर्वक करावा," असंही उर्जित पटेल म्हणाले.

भाजपचं सरकार असलेल्या उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. तर महाराष्ट्रातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबर देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.