Famous Dishes of India: भारत(India) हा खवय्यांचा देश आहे, असंही म्हटलं जातं. भारतात खाद्य सांस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतामध्ये विविध राज्यांमधील चविष्ठ पदार्थांवर ताव मारण्यासाठी परदेशातील लोक येत असतात. भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये मिळणाऱ्या खाद्यपदार्थाची वेगळी चव असते. शाकाहारी आणि मांसाहारी असे वेगवेगळे पदार्थ भारतातील विविध राज्यांमध्ये तुम्हाला चाखायला मिळतील. जाणून घेऊयात या प्रसिद्ध पदार्थांबद्दल...


जम्मू आणि काश्मीर
काश्मीरमधील प्रसिद्ध पदार्थ हे मांसाहारी आहेत. मटण रोगन जोश, कश्मीरी गाद, गोश्तबा हे काश्मीरमधील प्रसिद्ध मांसाहारी पदार्थ आहेत. पण जर तुम्ही शाकाहारी असाल तर दम आलू नक्की ट्राय करा. दम आलूसोबत तुम्ही नाना किंवा रोटी खाऊ शकता. 


पंजाब 
'दिस का रास्ता पेट से जाता है', असं मत असणारे लोक पंजाबमध्ये राहतात. पंजाबमध्ये मक्के की रोटी, सरसों का साग या पदार्थांबरोबरच छोले- भटूरे, राजमा-चावल, नॉन, पराठे, लस्‍सी हे पदार्थ खाण्यासाठी लोक परदेशातून येतात. 


गुजरात
गुजरात राज्य म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते ढोकळा आणि थेपला हे पदार्थ. येथील उंधियो हा पदार्थ देखील चविष्ठ आहे. 


महाराष्ट्र
महाराष्ट्रामधील प्रसिद्ध खाद्य पदार्थांचा विचार केला तर वेगवेगळ्या पदार्थांची न संपणारी यादी डोळ्यासमोर येते. पिठलं भाकरी, तांबडा पांढरा रस्सा, वडापाव, मिसळ यांसारखे पदार्थ इतर राज्यांमधील तसेच इतर देशांमधील लोक आवडीनं खातात. 




राजस्‍थान
राजस्थानमधील भुजिया,सान्गरी,दाल बाटी, चूरमा, पिटौर की सब्जी, दाल की पूरी, मावा मालपुआ, बीकानेरी रसगुल्ला हे प्रसिद्ध पदार्थ आहेत. 


मध्य प्रदेश
मध्य प्रदेश राजस्थानच्या जवळ आहे, त्यामुळे या दोन राज्यांच्या प्रसिद्ध पदार्थांमध्ये साम्य दिसून येते. येथील दाल बाफला हा पदार्थ लोक आवडीनं खातात. हा पदार्थ दाल बाटी चूरमा सारखाच आहे. 


बिहार
बिहारमधील लिट्टी चोखाची चव चाखण्यासाठी विविध राज्यातील तसेच देशातील लोक बिहारमध्ये जातात. 


उत्तर प्रदेश 
लखनौचे कबाब, बिर्यानी, बेडमी आलू, हलवा, बनारसी चाट हे उत्तर प्रदेशमधील प्रसिद्ध पदार्थ आहेत. 


उत्तराखंड
उत्तराखंडमधील दाल-रोटी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. ही डिश जरी साधी वाटली तरी हा पदार्थ चविष्ठ आहे. दाल ही फानु या डाळीपासून तयार करण्यात येते.  


पश्चिम बंगाल
दाब चिंगरी, झिंगे आलू, भेटकी माछर पटुरी हे पदार्थ पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध पदार्थ असून येथील मिठाई देखील फेमस आहे. 


आंध्र प्रदेश
पुलिहोरा,छिपा पुलुसु,पुनुगुलु, डोंडाकाया फ्राई यांसारखे आंध्र प्रदेशातील पदार्थ लोक आवडीनं खातात. 




अरुणाचल प्रदेश 
पिका पिला, बॅम्बू शूट, लुक्टर, पहलू आणि अपोंग हे अरुणाचल प्रदेशमधील प्रसिद्ध पदार्थ आहेत. 


आसाम 
आसाममधील डक मीट,आलू पिटिका,खार, गोरूर पायस हे पदार्थ खाण्यासाठी अनेक पर्यटक आसामला भेट देतात. 


छत्तीसगड
आमत, मुथिया, बरा, फरा यांसारखे छत्तीसगडमधील चविष्ठ पदार्थ प्रसिद्ध आहेत. 


गोवा 
गोवा हे राज्य जगभरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. गोव्यामध्ये मिळणारे सी-फूड खाण्यासाठी परदेशातून लोक येतात. गोअन फिश करी,फिश रीचीडो, फीजोडा हे गोव्यातील प्रसिद्ध पदार्थ नक्की ट्राय करा. 


हरियाणा
कचरी सब्जी, मिक्स्ड दाल, खीर-शक्कर, बाजरे-मक्की की रोटी, मिस्सी रोटी, छोलिया चटनी,  दाल, गुलगुले, रायता, कढी-चावल हे हरियाणामधील प्रसिद्ध पदार्थ आहेत. 


हिमाचल प्रदेश
धाम, माद्रा, सिद्धू, भेय, छा गोश्त , बबरू, खट्टा हे हिमाचल प्रदेशमधील पदार्थ नक्की ट्राय करा. 


केरळ 
केरळ येथे शाकाहारी, मांसाहारी आणि मिठाई या सर्व प्रकारचे पदार्थ पर्यटकांना चाखायला मिळतील.  झींगा करी,नादान बीफ फ्राई,अप्पम, इडियप्पम विथ करी,डोसा घी रोस्ट विथ सांभर हे पदार्थ तुम्हाला मिळतील. 


कर्नाटक 


कर्नाटकमध्ये कोरी गस्सी,नीर डोसा, मद्दुर वडा यांसारखे पदार्थ तुम्हाला कर्नाटक येथे मिळतील. 


झारखंड
चिल्का रोटी,मालपुआ आणि बांसपासून तयार केलेले पदार्थ खाण्यासाठी पर्यटक झारखंडला भेट देतात. 


मणिपूर
ऐरोबा,चामथोंग,पाक्नम हे मणिपूरचे प्रसिद्ध नक्की ट्राय करा. 


मेघालय
जादोह,दोह,नखम बिच्ची,पुमालोई हे मेघालय येथीस प्रसिद्ध पदार्थ आहेत. 


मिझोराम
मिझोराममधील लोकांना तांदळापासून तयार केलेल पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे येथे तांदळापासून तयार केलेले पदार्थ प्रसिद्द आहेत.  वौक्सा रेप, अरसा बुछिकर, कोठा पीठा, पूअर मच और दाल हे मिझोराममधील पदार्थ प्रसिद्ध आहेत. 


नागालँड


समथू, ऐकिबे, अकिनी हे नागालँडमध्ये पदार्थ चाखण्यासाठी येथे परदेशामधील लोक येतात. 


सिक्कीम 
दहीबडा, आलूदम, रसबली ,मुडी-मनसा हे सिक्कीममधील पदार्थ नक्की ट्राय करा. 


त्रिपुरा
त्रिपुरा येथील मुई बोरोक हा प्रसिद्ध पदार्थ आहे. तसेच मॉसडेंग सेरमा, व्हान मॉसडेंग त्रिपुरामधील पदार्थ देखील तुम्ही ट्राय करु शकता.