लग्नासाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे. पण अचानकपणे सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे काही कुटुंबांची चिंता वाढली आहे. शिवाय कपड्यांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन नोटा लागतात. त्याची तरतूदही झाली नाही.
मुंबईतील घाटकोपरमध्ये सत्यदेवी शर्मा यांच्या घरी मुलाचं लग्न आहे. 8 डिसेंबरला लग्न होणार आहे. पण त्या लग्नाच्या तयारीसाठीची खरेदी रखडली आहे. त्यामुळे शर्मा कुटुंबाप्रमाणे अनेक परिवारांची चिंता वाढली आहे. अर्थात या कुटुंबांकडे डेबिट कार्डद्वारे शॉपिंग करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र किरकोळ खरेदी करण्यासाठी दोन-तीन दिवस अडचणी येण्याची शक्यता आहे.