नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)च्या नावाने एक सर्क्युलर व्हायरस होत आहे. यामध्ये भारतातील लॉकडाऊनसाठी प्रोटोकॉल लावण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
WHO च्या नावाने पसरवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं आहे की, 'वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने भारतामध्ये सर्वात घातक कोरोना व्हायरस रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये प्रोटोकॉल ठरवले आहेत. त्याचबरोबर दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येणार असल्याचंही यामध्ये सांगण्यात आलं आहे.
व्हायरस होणाऱ्या या सर्क्युलरबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने स्पष्टिकरण दिलं असून हा व्हायरस मेसेज फेक असल्याचं सांगितलं आहे. तसेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनने असे कोणतेही आदेश दिले नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनचा आदेश म्हणून जो मेसेज व्हायरल होत आहे, तो फेक असून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन लॉकडाऊनसाठी कोणताच प्रोटोकॉल ठरवलेला नसल्याचं डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे.
काय लिहिलं आहे फेक सर्क्युलरमध्ये?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या नावाने व्हायरल करण्यात आलेल्या फेक सर्क्युलेशनमध्ये सांगण्यात आलं आहे की, भारतात पुढे लॉकडाऊनचे नियम कसे असतील, तसेच 15 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन हटवण्यात येईल तर त्यानंतर 20 एप्रिलपासून ते 18 मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल. जर यादरम्यान कोरोना व्हायरसच्या रूग्णांमध्ये कपात आली तर लॉकडाऊन काढून टाकण्यात येईल. दरम्यान, आता डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं आहे की, हा व्हायरल होणारा मेसेज फेक आहे.
पाहा व्हिडीओ : पाच मिनिटात रिझल्ट देणारं रॅपिड किट नेमकं कसं काम करतं? स्पेशल रिपोर्ट
दरम्यान, भारतात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत भारतात लॉकडाऊन असणार आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून सध्या भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 4000 पार गेला आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडाही 100 पार गेला आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | देशातील कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, 62 जिल्ह्यात 80 टक्के रुग्ण!
Coronavirus : भारतात कोरोनाबाधितांची संख्या 4000 पार, तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!