नवी दिल्ली : कोरोनापुढे अख्खं जग हतबल झालं असून भारतातही कोरोना फोफावत आहे. रविवारी राजस्थान, गुजरातमध्ये प्रत्येकी एक-एक, महाराष्ट्रात तीन आणि तामिळनाडूमध्ये दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच आंध्रप्रदेशमध्ये 34, महाराष्ट्रात 26, राजस्थानमध्ये सहा, गुजरातमध्ये 14, मध्यप्रदेशमध्ये 12 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून कोरोना बाधितांचा एकूण आकडा 4000 वर पोहोचला आहे. तर देशात या व्हायरसमुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीमध्ये तब्लिगींमुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ
आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 4000 कोरोना बाधितांपैकी 291 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीमध्ये रविवारी कोरोनाचे 58 नवीन रूग्ण आढळून आले. राज्यामध्ये आतापर्यंत संख्या 500 पार पोहोचली आहे. तर फक्त दिल्लीमध्ये 320 कोरोना बाधित आहेत.
पाहा व्हिडीओ : मुंबईत 433 कोरोनाबाधित, मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट नेमके कोणते?
कोणत्या राज्यात किती रूग्णांचा मृत्यू?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये 11, तेलंगणामध्ये 7, मध्यप्रदेशमध्ये 9, दिल्लीमध्ये 7, पंजाबमध्ये 5, कर्नाटकात 4, पश्चिम बंगालमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि केरळमध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूमध्ये तीन, आंध्रप्रदेश, बिहार आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या राज्यात किती कोरोना बाधित?
तब्लिगींमुळे वाढली कोरोना बाधितांची संख्या
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जर तब्लिगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाली नसती तर देशात कोरोनाची परिस्थिती अत्यंत वेगळी असती. फक्त तब्लिगींमुळे 21 राज्यांत एकूण 1095 कोरोना बाधित रूग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, आतापर्यंत देशात 274 जिल्हे कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकले आहेत.
मरकज प्रकरण नसतं झालं तर भारताचा कोरोना संसर्ग दर अत्यंत कमी असता, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव अग्रवाल यांनी सांगितलं. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की, 'Covid-19 चे रूग्ण सध्याच्या स्थितीत दिवसाला सरासरी 4.1 असे दुप्पटीने वाढत आहेत.
संबंधित बातम्या :
Corona Update | तबलिगींमुळे देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
#Markaz | निजामुद्दीनमधलं 'मरकज' दिल्लीतल्या कोरोनाचं केंद्र, 'मरकज' म्हणजे नेमकं काय?