श्रीहरिकोटा : मंगळ आणि चंद्राची यशस्वी मोहीम झाल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) आता सूर्याची मोहीम (Mission Sun) हाती घेतली आहे. त्यासाठी इस्रो आता सज्ज झाला असून सौरमंडळाचा अभ्यास भारत करणार आहे. यामुळे सूर्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा करण्यास इस्रोला मदत होणार आहे. 


इस्रो का करतयं सूर्याचा अभ्यास?


सूर्य हा इतर ताऱ्यांच्या तुलनेत पृथ्वीच्या जवळचा तारा आहे. त्यामुळे इतर ताऱ्यांपेक्षा सूर्याचा अभ्यास करणं हे जास्त सोपं असू शकतं. सूर्यामधील काही कणांचा अभ्यास करण्याची गरज इस्रोला वाटली. तसेच सूर्य हा उर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत असून अनेक घटकांचा समावेश सूर्यामध्ये आहे. बऱ्याचदा काही उर्जेचे स्फोट सूर्यामध्ये होत असतात. पृथ्वी ही सूर्याच्या जवळ असल्याने या स्फोटांमुळे पृथ्वीला देखील धोका निर्माण होऊ शकतो. 


असे संभाव्य धोके टाळण्यासाठी, लवकर शोध घेण्यासाठी संधोशन करणे महत्त्वाचं असल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. सूर्य एक नैसर्गिक प्रयोगशाळा म्हणून काम करतो. त्यामुळे मानवी घटकांचा अभ्यास करण्यासाठी एक वेगळं क्षेत्र सूर्यामुळे निर्माण होतं. म्हणूनच सूर्याचा अभ्यास ही अंतराळातील एक महत्त्वपूर्ण घटना असून अत्यंत महत्त्वाचा असल्याचं इस्रोचं म्हणणं आहे. 


आदित्य एल1 सूर्याची रहस्य उलघडणार? 


आदित्य एल1 हे भारताच्या अंतराळ मोहिमांमधील एक महत्त्वपूर्ण मोहीम आहे, जी सूर्यावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. हे अंतराळयान सूर्याच्या L1 बिंदूच्या कक्षेत राहणार आहे. यामुळे सूर्याच्या जवळून अभ्यास करणं शक्य होणार आहे. आदित्य एल1 मध्ये सात वेगवेगळे पेलोड्स बसवण्यात आले आहे. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन पेलोड्स हे सूर्यमंडळाचा अभ्यास करणार आहे.  त्यामुळे सूर्यामधील अनेक रहस्य देखील भारत आता उलगडणार आहे. 


मोहिमेची उद्दिष्ट कोणती?


सूर्यामधील महत्त्वाचा गोष्टींचा शोध घेणं हे या मोहिमेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. तसेच कोरोनल हीटिंगमध्ये हे यान संशोधन करणार आहे. सौरमंडळातील वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल. या मोहिमेमुळे इस्रोला जागतिक स्तरावर आपलं नाव उमटवण्यात मदत होणार आहे. नासाच्या पायनियर मिशनपासून ते अलीकडेच युरोपियन स्पेस एजन्सीने लाँच केलेल्या सोलर ऑर्बिटर सारख्या मोहिमांमध्ये आता इस्रोच्या आदित्य मोहिमेचा देखील समावेश होणार आहे. त्यामुळे भारताच्या या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


हेही वाचा : 


Aditya-L1 Mission : आदित्य L-1 मोहिमेतील L1 पॉइंट म्हणजे नक्की काय? काय आहे L2, L3, L4 आणि L5 चा अर्थ? जाणून घ्या