नवी दिल्ली : 24 परदेश दौऱ्यांमध्ये 30 हून अधिक देशांचा दौरा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा खर्च पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) आपला वेबसाईटवर जाहीर केला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, पीएमओने मोदींच्या परदेश दौरा आणि त्यासाठीच्या चार्टर्ड फ्लाईट्सचा खर्च वेबसाईटवर जाहीर केला आहे. 2014 या वर्षी पंतप्रधान पदाशी शपथ घेतल्यानंतर मोदींनी सात देशांचा दौरा केला.
पीएमओच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, मोदींच्या परदेश दौऱ्यासाठी चार्टर्ड फ्लाईट्सवरील खर्च जाहीर केला आहे. यात मोजक्या देशांच्या दौऱ्याबाबतचा खर्च जाहीर करण्यात आला आहे. बाकीच्या दौऱ्यांबाबत खर्च अद्याप पीएमओकडे आलं नसल्याने तो खर्चा अद्याप वेबसाईटवर टाकण्यात आला नाही.
पंतप्रधान मोदींच्या चार्टर्ड फ्लाईट्सचा खर्च :
भूतान– 2 कोटी 45 लाख 27 हजार 465 रुपये
ब्राझील- 20 कोटी 35 लाख 48 हजार रुपये
नेपाळ- भारतीय वायुसेनेच्या बोईंग बिझनेस जेटचा (BBJ) वापर
जापान- 13 कोटी 47 लाख 58 हजार रुपये
अमेरिका- 19 कोटी 04 लाख 60 हजार रुपये
म्यानमार, ऑस्ट्रेालिया आणि फिजी– 22 कोटी 58 लाख 65 हजार रुपये