ABP-CVoter Exit Poll 2021 LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता, एबीपी माझा-सी व्होटरच्या एक्झिट पोलचा अंदाज

ABP-CVoter 5 States Exit Poll 2021 LIVE Updates:2 मे रोजी बंगालसह सर्व राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी माझावर आपण एक्झिट पोलचे निकाल पाहू शकणार आहोत. या पाच राज्यांमध्ये कुणाचं सरकार येणार? याबाबत सर्वात सटीक असे एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजेपासून एबीपी माझावर पाहू शकणार आहोत.  

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Apr 2021 04:41 PM
आसाममध्ये भाजपची सत्ता परत येण्याची चिन्ह

आसाममध्ये मतांच्या टक्केवारीत दुसऱ्या नंबरला असून देखील भाजपची सत्ता परत येण्याची चिन्ह आहेत. आसाममधील 126 विधानसभेच्या जागांपैकी भाजपला 58-71 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर काँग्रेस प्रणित यूपीएला 53-66 जागा तर इतरांच्या खात्यात  0-5 जागा जाण्याची शक्यता आहे.

तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान

तामिळनाडुमध्ये भाजप-एआयएडीएमके आघाडीला मोठं नुकसान होताना दिसत आहे. विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी भाजप-एआयएडीएमके  आघाडी 58-70 जागा मिळतील. तर डीएमके-काँग्रेस आघाडीला 160-172 जागांवर विजय मिळेल असा अंदाज आहे तर इतरांच्या खात्यात 0 ते 7 जागा जातील असा अंदाज आहे.  

पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार

पुद्दुचेरीमध्ये भाजप आघाडीला विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. भाजप आणि सहयोगी पक्षाला 19-23 जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 6 ते 10 जागा मिळू शकतात.  30 जागा असलेल्या विधानसभेत इतर पक्षांच्या 1 ते 2 जागा येण्याची शक्यता आहे. 

केरळमध्ये लेफ्टचं सरकार येण्याची शक्यता

केरळमधील निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार इथं लेफ्टचं सरकार येण्याची शक्यता आहे. राज्यातील 140 जागांपैकी 71 ते 77 जागी लेफ्ट तर काँग्रेस प्रणित यूडीएफला 62-68 जागांवर विजय मिळू शकतो. भाजपला 0 ते 2 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.  

उत्तर बंगाल एक्झिट पोल

उत्तर बंगाल एक्झिट पोल तृणमूल काँग्रेस+: 11-13 भाजप+ : 14-16 काँग्रेस+ : 0-2

पश्चिम बंगाल एक्झिट पोल

पश्चिम बंगाल एक्झिट पोल | सुंदरबन रिजन (26 जागा) तृणमूल काँग्रेस+: 13-15 भाजप+ : 11-13 काँग्रेस+ : 0-1

पश्चिम बंगालचा एक्झिट पोल

पश्चिम बंगालचा एक्झिट पोल (292 जागा)

TMC+ : 152-164
BJP+ : 109-121
CONG+ : 14-25

पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता

पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींची तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता, एबीपी माझा-सी व्होटरच्या एक्झिट पोलचा अंदाज

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता!

पश्चिम बंगालमध्ये 109 ते 121 जागांवर कमळ फुलण्याची शक्यता, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल सत्ता राखण्याची शक्यता!

कुठं कुठं पाहू शकता एक्झिट पोल

टीव्हीसोबतच मोबाईल फोन आणि अन्य प्लॅटफॉर्मवर आपण टेक्स्ट, फोटो, व्हिडियोद्वारा माहिती सोबत ABP माझाच्या लाईव्ह टीव्हीवर हे एक्सिट पोलचे निकाल पाहू शकता.  लोकप्रिय व्हिडीयो स्ट्रीमिंग वेबसाईट आणि अॅप Hotstar वर देखील आपण पोलचं लाईव्ह कव्हरेज पाहू शकाल. सोबतच आपण एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा निकाल पाहू शकाल. आपण आपल्या एंड्राईड तथा आयओएस स्मार्टफोनमध्ये ABP Live अॅप इंस्टॉल करुन लाईव्ह टीव्हीवर हे कव्हरेज पाहू शकाल तसेच यासंबंधीत स्टोरीज वाचू शकाल. 

एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजेपासून एबीपी माझावर

ABP-CVoter 5 States Exit Poll 2021 LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आज आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांचं मतदान सुरु आहे. त्याआधी आसाम,केरळ, तामिलनाडु आणि पुद्दुचेरीमधील निवडणुका संपल्या आहेत. 2 मे रोजी बंगालसह सर्व राज्याच्या निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी माझावर आपण एक्झिट पोलचे निकाल पाहू शकणार आहोत. या पाच राज्यांमध्ये कुणाचं सरकार येणार? याबाबत सर्वात सटीक असे एक्झिट पोलचे निकाल आज सायंकाळी पाच वाजेपासून एबीपी माझावर पाहू शकणार आहोत.  

पार्श्वभूमी

कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल

लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com/live-tv 
मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com/ 
इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com/ 

Youtube
-

हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w 
इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv 
 मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv 

हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews 
इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive 
मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09 
इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.