अॅक्सिस बँक घोटाळ्यात माजी मंत्र्यांचं नाव?
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2016 03:20 PM (IST)
नवी दिल्ली: दिल्लीतील अॅक्सिस बँक घोटाळ्यात एका माजी मंत्र्यांचं नाव समोर येत आहे. याशिवाय काही राजकीय नेते, बिल्डरही यात सहभागी असल्याची शक्यता एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे. काळा पैशाविरोधात आयकर विभागाची मोहीम सुरु आहे. दिल्लीतील अॅक्सिस बँकेत तब्बल 44 बनावट खाती आढळली आहेत. या बँक खात्यांमध्ये 100 कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाल्याचं उघड झालंय. दिल्लीतल्या चाँदनी चौक बँक शाखेत हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी अॅक्सिस बँकेच्या मॅनेरजला अटक करण्यात आली आहे. बँक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं जुन्या नोटा बदलून देण्याचा प्रकार आणखी कुठे झाला का याचीही चौकशी सुरु आहे.