ईपीएफओशी आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
एबीपी माझा वेब टीम | 07 Jun 2017 12:00 AM (IST)
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)ने आपल्या 4 कोटीहून अधिक सदस्यांना आधार क्रमांक लिंक करण्यासाठी आणखी मुदत दिली आहे. 30 जूनपर्यंत ही मुदत वाढण्यात आली असून पूर्वोत्तर राज्यांसाठी 30 सप्टेंबरपर्यंत ही मुदत आहे. ईपीएफओनं काढलेल्या एका पत्रकात म्हटलं आहे की, सर्व फिल्ड कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले आहेत. सर्व सदस्यांना आधार क्रमांक 1 जुलै 2017 पर्यंत जमा करायचं आहे तर पूर्वेकडील राज्यांना हे काम 1 ऑक्टोबर 2017 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ईपीएफओनं आपल्या सर्व सदस्यांना जानेवारीमध्ये आधार क्रमांक लिंक करण्याबाबत सांगितलं होतं. अद्यापही अनेक सदस्यांनी आधार लिंक केलेलं नसल्यानं आता ही मुदतवाढ देण्यात आली आहे.