1 जुलैपूर्वी टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिनवर बंपर सूट?
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 08:59 PM (IST)
मुंबई: टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंग मशिनची खरेदी करण्याचा आपण विचार करत असाल तर आपल्यासाठी गुड न्यूज आहे. कारण 1 जुलैच्याआधी बंपर सूट मिळण्याची शक्यता आहे. 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे आणि जीएसटी लागू होण्याआधी कंपन्या जुना स्टॉक खपवण्यासाठी 20 ते 40 टक्के सूट देऊ शकतात. जुन्या वस्तूंवर अधिक टॅक्सपासून वाचण्यासाठी कंपन्या सूट देऊन वस्तू विक्री करण्याची शक्कल लढवत आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांना जुन्या वस्तूंवर अधिक टॅक्स भरावा लागणार आहे. त्यामुळे आता जुन्या वस्तूवर जास्तीत जास्त सूट देऊन स्टॉक संपवण्याचा प्रयत्न कंपन्या करु शकतं.