नवी दिल्ली: केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचं हृदविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते 60 वर्षांचे होते.


हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अनिल दवे हे मोदी सरकारमध्ये विद्यमान वन आणि पर्यावरण राज्यमंत्री होते. त्यांनी मंत्रिपद स्वीकारुन अजून एक वर्षही पूर्ण झालेलं नाही.

उज्जैनचे रहिवासी असलेले अनिल दवे हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दवे यांनी कालच दिल्लीत जीएम मोहरीसंदर्भात बैठक घेतलेली होती.

दरम्यान, अनिल दवे यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांवर 'शिवाजी आणि सुराज' हे पुस्तक लिहिलं आहे. शिवरायांचं नियोजन आणि अचूक निर्णय क्षमतेवर त्यांनी प्रकाशझोत टाकला होता.

या पुस्तकाचं मराठी भाषांतरही करण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन अनिल दवे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.