National Herald Case : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची आज अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून (ED) दोन तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. या कालावधीत ईडीकडून सोनिया गांधी यांना जवळपास 24 प्रश्न विचारण्यात आले. ईडीने चौकशीदरम्यान डॉक्टरचीही व्यवस्था केली होती. यादरम्यान सोनिया गांधी यांना दोन वेळा औषधही देण्यात आले. येत्या सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले आहे.
सोनिया गांधी गुरुवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी ईडीच्या मुख्यालयात चौकशीसाठी पोहोचल्या. यावेळी त्यांच्यासोबत प्रियांका गांधीही होत्या. सोनिया गांधी ईडी मुख्यालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच राहुल गांधीही ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. ईडीच्या मुख्यालयात पोहोचण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी ईडीला विनंती केली होती की, त्यांच्या औषधाबाबत फक्त प्रियांका यांनाच फक्त माहिती आहे, त्यामुळे त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. यासोबतच सोनिया गांधी यांनी ईडीला चौकशी पथकाकडून कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींच्या आजच्या प्रश्नोत्तरादरम्यान त्यांना 24 प्रश्न विचारता आले. सोनिया गांधी यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे इंग्रजीत दिली. यासोबतच सोनिया गांधी यांनी प्रश्नांची उत्तरे संगणकावर रेकॉर्ड करण्यासाठी सहाय्यकाची मागणी केली.
सोनिया गांधी ईडीच्या मुख्यालयात पोहोचताच अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विशेष म्हणजे त्यांची तीन टप्प्यांत चौकशी होणार होती, मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. ईडीने त्याच्यांसाठी अनेक प्रश्न तयार केले होते. परंतुस आज ठरलेल्या वेळेनुसार चौकशी पूर्ण होऊ शकली नाही. दुपारी अडीच वाजता ईडीने सोनिया गांधी यांची सुटका केली. येत्या सोमवारी सोनिया गांधी यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. याच प्रकरणी ईडीने राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे.
यावेळी सोनिया गांधी यांना त्यांची बँक खाती, आयकर रिटर्न, देश-विदेशातील मालमत्ता याबाबत प्रश्न विचारण्यात आले. याशिवाय सोनिया गांधींकडून यंग इंडियाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांमध्ये यंग इंडिया बनवण्याचा विचार, त्याची पहिली बैठक, बैठकींमधील त्यांचा सहभाग याविषयी प्रश्न विचारण्यात आले. दहा जनपथवर यंग इंडियाची बैठक झाली होती का? अशी विचारणा ईडीने केली होती.
ईडीने सोनिया गांधी विचारले की, हे संपूर्ण प्रकरण आधीच ठरलेले आहे का? कारण तुम्ही यंग इंडियन एजीएल आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आहात. याबरोबरच यंग इंडियन आणि एजीएलच्या निधीचे व्यवस्थापन करण्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.