Bundelkhand Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाच दिवसांपूर्वी बुंदेलखंड एक्स्प्रेस-वेचं (Bundelkhand Expressway) उद्घाटन केले. पण फक्त पाच दिवसांमध्येच या एक्स्प्रेस वेवर मोठा खड्डा पडलाय. एक्स्प्रेस-वेवर दोन फूटाचा खड्डा पडलाय. तात्काळ जेसीबी बोलवत एक्स्प्रेस वे दुरुस्त करण्यात आला. त्यानंतर सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु झाली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. नेटकरी या एक्स्प्रेस वेच्या गुणवत्‍तेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.  बुंदेलखंड एक्स्प्रेस-वे अवघ्या 28 महिन्यात तयार झाला आहे. 


उद्धघाटनच्या पाचव्या दिवशी जालौन परिसरात छिरिया सलेमपूरजवळ बुंदेलखंड एक्स्प्रेस वेची रस्ता खचला. धक्कादायक म्हणजे, पाच दिवसांत या हायवेवर चार जणांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. बुधवारी रात्री दुचाकी आणि कार यांचा भीषण अपघात झाला होता. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी एक्स्प्रेस वेच्या गुणवत्‍तेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. 






























यूपीईआयडीए अर्थात उत्तर प्रदेश द्रुतगती महामार्ग औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या देखरेखीखाली सुमारे 14,850 कोटी रुपये खर्चाच्या या चौपदरी 296 किलोमीटर लांबीच्या द्रुतगती महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे.  पुढील काळात या महामार्गाचा विस्तार करून हा मार्ग सहापदरी देखील करता येऊ शकेल. हा  द्रुतगती महामार्ग  चित्रकूट जिल्ह्यातील भरतकूपजवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 35 पासून इटावा जिल्ह्यातील कुद्रैल गावापर्यंत आहे आणि या गावाजवळ हा महामार्ग आग्रा-लखनौ द्रुतगती महामार्गाला जाऊन मिळतो. हा द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा,हमीरपुर, जालौन, ऑरैय्या आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जातो.


महामार्गाच्या बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च
296 किमी परिसरात पसरलेल्या या एक्स्प्रेसवेमुळे आता दिल्ली ते चित्रकूटपर्यंतचा वेळ जवळपास निम्म्याने कमी होणार आहे. जिथे आधी 12 ते 14 तास लागायचे तिथे आता हे अंतर 6 तासात पूर्ण होणार आहे. या एक्स्प्रेस वेची जमीन खरेदी करण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एक्स्प्रेस वेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे यात 15 हून अधिक उड्डाणपूल, 10 हून अधिक मोठे पूल, 250 हून अधिक छोटे पूल, 6 टोल प्लाझा आणि चार रेल्वे पूल आहेत.