Emergency 1975: भारतात ज्या काळात लोकशाहीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते त्या काळाला आज 48 वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी म्हणजे 25 जून 1975 रोजी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी आणीबाणी (Emergency) जाहीर केली होती. सलग 21 महिने लागू करण्यात आलेल्या या आणीबाणीच्या काळामुळे आजही काँग्रेसवर टीका करण्यात येते. दरम्यान आजही अनेक राजकीय पक्षांनी यावर प्रतिक्रिया दिला आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील यावर भाष्य करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी म्हटलं की, 'हा देशातील कधीही न मिटणारा कलंक आहे.' 


गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'आजच्या दिवशी 1975 साली एका परिवाराने आपल्या हातातून सत्ता जाण्याच्या भीतीने लोकांच्या अधिकांराना हिसकावून आणि लोकशाहीची हत्या करुन देशात आणीबाणी लादली होती. '


'हा कधीही न मिटणारा कलंक'


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत पुढे म्हटलं की, 'स्वत:च्या सत्तेच्या स्वार्थासाठी लावण्यात आलेली आणीबाणी ही काँग्रेसच्या हुकुमशाहीच्या मानसिकतेचे प्रतीक आहे आणि जो कधीही मिटणार नाही असा देशाला लागलेला कलंक आहे. त्या कठिण काळामध्ये अनेक यातना सहन करुन लोकशाहीला पुन्हा जिवंत करण्यासाठी लोखो लोकांनी संघर्ष केला. मी त्या सर्व देशभक्तांना नमन करतो.' 






आणीबाणीच्या काळावर इतर राजकीय प्रतिक्रिया


केंद्रीय सुरक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, 'भारतीय लोकशाहीच्या इतिहासात 48 वर्षांनंतर देखील आणीबाणीच्या काळाला एका काळ्या अध्यायाच्या रुपात पाहिले जाते. एका रात्रीमध्ये ज्या पद्धतीने आणीबाणी लावण्यात आली त्याला सत्तेचा दुरुपयोग करणे आणि हुकुमशाहीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. '


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, 'भारताची महान लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी न घाबरता, न डगमगता, न झुकता क्रूर हुकूमशाहीचा कडवा प्रतिकार करणाऱ्या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!"


महत्त्वाच्या इतर बातम्या :


पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यामुळे भारतीय वारसा अन् संस्कृतीला जागतिक स्तरावर चालना मिळणार? सर्वेक्षणातून काय आलं समोर?