प्रतापगड (उत्तर प्रदेश): क्रूर मालकाच्या कचाट्यातून एका 55 वर्षांच्या हत्तीला तब्बल 15 वर्षांनी सुटका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तीन वर्षांची कायदेशीर लढाई लढून वन विभागाने मोहनची सुटका केली. वन विभागाकडे मोहन नावच्या हत्तीची केस 2001 साली आली होती. प्राणी प्रेमी, वन विभाग आणि पोलिसांनी मोहनच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे, असं वन विभागाने सांगितलं.


 

 

मानसाला त्रास झाला तर तो शब्दात व्यक्त करु शकतो. मात्र मुक्या जनावराला कितीही कष्ट झाले, कितीही त्रास झाला तरी सहन करण्याशिवाय पर्याय नसतो. अशाच परिस्थितीला उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील एक हत्ती 15 वर्षांपूर्वी बळी पडला. एका शेवटच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर मोहनचा ताबा वन विभागाला मिळेल, असं वन विभागाने सांगितलं.

 

तब्बल 15 वर्षांचा कठोर वनवास, कायदेशीर लढाई


 

प्राणी जंगलात मिळेल त्या अन्नावर जिवंत राहतात. मात्र मात्र मानसाच्या पिंजऱ्यात प्राण्याचं आयु,य किती वाईट आहे, हे या उदाहरणातून समोर आलं आहे. मोहनला मालकाने लोखंडी साखळीने एका जागेवर बांधून ठेवलं होतं. अनेकदा बांधून मारपीट करत अन्नपाण्याशिवाय मोहनला नरक यातना दिल्या.

 

 

मोहनवर मालकी हक्क कोणाचा, हा प्रश्न अजूनही कायम आहे. न्यायालयाने मोहनची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. मोहनच्या सुटकेचा खटला इलाहाबाद हायकोर्टातही एक वर्षापासून सुरु आहे. मोहनला तीन दिवसात वन विभागाने ताब्यात घेऊन देखरेख करावी, असे आदेश 12 जुलैला सत्र न्यायालयाने दिले होते.