नवी दिल्ली : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 11 मार्चला लागणार आहे.
गोवा, पंजाब आणि उत्तरखंडमध्ये एकाच टप्प्यात, तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यात आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक 7 टप्प्यात मतदान पार पडलं.
कोणत्या राज्यात मतदान कधी?
गोवा विधानसभा निवडणूक (40) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
पंजाब विधानसभा निवडणूक (117) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
उत्तराखंड विधानसभा निवडणूक (71): 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (403) : 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
पाच राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाण कधी संपणार?
उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ 27 मे, पंजाब, मणिपुर, गोवा विधानसभेचा 18 मार्च आणि उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाल 26 मार्च रोजी पूर्ण होत आहे.
पाच राज्यांमध्ये किती विधानसभेच्या जागा?
उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. पंजाब विधानसभेत 117 जागा, गोवा विधानसभेत 40 जागा, उत्तराखंड विधानसभेत 70 जागा आणि मणिपूर विधानसभेत 60 जागा आहेत.
एक्झिट पोलमध्येही मोदी लाट
विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये देशात अजूनही मोदी लाट कायम आहे. चार राज्यात भाजपला मोठं यश मिळणार असल्याचं भाकित वर्तवण्यात आलं आहे. पाच राज्यांपैरी चार राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. जर पाच चॅनलच्या आकड्यांची सरासरी पाहिली तर उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत आहे. उत्तराखंडमध्ये भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करणार असल्याचा अंदाज आहे. तर एक्झिट पोलनुसार, गोव्यातही भाजप सरकार स्थापन करु शकतं. याशिवाय पंजाबमध्ये भाजप आघाडी आणि काँग्रेससमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं तगडं आव्हान असणार आहे.
एबीपी माझावर सुपरफास्ट निकाल
या सर्व निकालांचं अचूक आणि सर्वात जलद कव्हरेज तुम्ही उद्या दिवसभर एबीपी माझावर पाहू शकता. तसंच नेटीझन्सना तुम्हाला सुपरफास्ट, अचूक निकाल www.abpmajha.in वेबसाईट, ABP LIVE हे मोबाईल अॅप, फेसबुक www.facebook.com/abpmajha, ट्विटर https://twitter.com/abpmajhatv या सर्व माध्यमातून निकाल पाहणार आहे.