नवी दिल्ली : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवारी 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेकडे पाठिंबा मागितला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत पुन्हा एकदा निवडून देण्याचे जनतेला आवाहन केले आहे.

मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "सबका साथ, सबका विकास या मुल्यांतर्गत काम करणाऱ्या एनडीएला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. गेल्या 70 वर्षांपासून देशवासियांचा ज्या गरचा पूर्ण केल्या नव्हत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांपासून कामे करतोय. आता वेळ आली आहे, या देशाला शक्तीशाली, समृद्ध आणि सुरक्षित करण्याची गरज आहे." नरेंद्र मोदींनी ट्वीट करताना फिर एक बार मोदी सरकार (#PhirEkBaarModiSarkar)असा हॅशटॅग वापरला आहे.


VIDEO



मोदींनी अजून एक ट्वीट करुन एनडीए सरकारने काय कामं केली, त्याबाबत माहिती दिली आहे. मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "50 कोटी भारतीयांना चांगले आरोग्य दिले. असंघटित क्षेत्रातील 42 कोटी लोकांना ओल्ड एज पेन्शनची सुविधा दिली. किसान सहाय्यता निधीअंदर्गत 12 कोटी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले."