Telangana DGP Anjani Kumar Suspended :  तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अंजनी कुमार यांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. 


एएनआय वृत्तसंस्थेनुसार, तेलंगणा डीजीपीसह राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन आणि नोडल अधिकारी महेश भागवत यांनी विधानसभा निवडणुकीचे उमेदवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांची हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डीजीपींनी त्यांना पुष्पगुच्छही दिला होता.


विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना डीजीपींच्या या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. 






तेलंगणात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार


तेलंगणातील 119 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेसने  64 जागांवर विजय मिळवला आहे. तर, भारत राष्ट्र समितीला 39 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 8 आणि एमआयएमला 7 जागांवर यश मिळाले आहे. तर, भारतीय कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर यश मिळाले आहे. काँग्रेसला 39. 40 टक्के मते मिळाली. तर, भारत राष्ट्र समितीला 37.35 टक्के मिळाली आहेत. तर, भाजपला 13.90 टक्के मिळाली असून एमआयएमला 2.22 टक्के मतदान झाले आहे. 


 मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला एकाच जागेवर विजय मिळाला होता. त्यानंतर, यंदाच्या निवडणुकीत त्यात वाढ झाली असून 8 जागांवर विजय मिळाला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :