पाच राज्यांमध्ये 4 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान निवडणुका होतील. तर पाच राज्यांचा निकाल 11 मार्चला जाहीर होणार आहे.
निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची मर्यादा देखील सांगितली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड राज्यातील उमेदवार जास्तीत जास्त 28 लाख रुपये खर्च करु शकतात. तर गोवा आणि मणिपूर राज्यातील उमेदवारांना 20 लाख रुपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे.
तारखा जाहीर, 5 राज्यांचा निकाल 11 मार्चला
निवडणूक आयोगाने निवडणूकही कॅशलेस करण्याकडे भर दिला आहे. उमेदवारांना 20 हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च चेकने करावा लागणार आहे. निवडणुकीसाठीचा 20 हजार रुपयांपेक्षाचा अधिक निधीही चेकने घ्यावा लागेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय.
पाच राज्यातील विधानसभांची सध्यस्थिती
इतकच नाही तर प्रचारादरम्यान टीव्ही आणि वृत्तपत्रातील जाहिरातींचा खर्च देखील निवडणूक खर्चांमध्ये ग्रहीत धरला जाईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.
निवडणुकीदरम्यान काळा पैशांचा वापर होऊ नये, तसंच मतदारांना भेटवस्तू किंवा इतर कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी निवडणूक लक्ष ठेवून असेल, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
कोणत्या राज्यात कधी मतदान?
गोवा विधानसभा निवडणूक (40) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
पंजाब विधानसभा निवडणूक (117) : 4 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
www.abpmajha.in
उत्तराखंड विधानसभा निवडणूक (71): 15 फेब्रुवारीला मतदान, 11 मार्चला निकाल
मणिपूर विधानसभा निवडणूक (60) : 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूक (403) : 11, 15, 19, 23, 27 फेब्रुवारी, 4 आणि 8 मार्चला मतदान, 11 मार्चला निकाल