Continues below advertisement


नवी दिल्ली : एकीकडे महाराष्ट्रात फोडाफोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असताना राजस्थानमध्येही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. आगामी महानगपालिका (Municipal Elections), पंचायत निवडणुकीत (Panchayat Elections) जागावाटपात योग्य हिस्सा दिला नाही तर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करू असा इशारा शिवसेना शिंदे गटाने (Eknath Shinde Shivsena) भाजपला दिला आहे. कोटा धर्मांतरण प्रकरणावरही शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे.


एनडीएने बिहारमध्ये बहुमत मिळवले असले तरी राजस्थानमध्ये शिंदे गटाने भाजपला स्पष्ट शब्दात अल्टीमेटम दिला आहे. तसेच पुढील महिन्यापर्यंत पक्षात एक लाख सक्रिय कार्यकर्ते तयार करणार असल्याचा दावा राजस्थानातील शिवसेना शिंदे गटाने केला.


Rajasthan Shivsena : शिवसेना शिंदे गटाची वाढती सक्रियता 


गेल्या वर्षी तीन आमदार पक्षात दाखल झाल्यानंतर राजस्थानमध्ये शिंदे गटाने आपली सक्रियता मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. प्रदेश अध्यक्ष प्रहलादसिंह आणि युवा प्रमुख सचिनसिंह गौड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं स्पष्ट केलं.


Rajasthan Election : जागावाटपात योग्य संधी द्या


शिंदे गटाचे प्रदेश अध्यक्ष म्हणाले की, "शिवसेना एनडीएचा एक भाग आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात भाजपसोबत आमची आघाडी आहे. जर राजस्थानातील पंचायत-नगरपालिका निवडणुकीमध्ये आम्हाला जागावाटपात समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वतंत्रपणेही लढू शकतो.”


Shivsena Vs BJP : युती न झाल्यास स्वतंत्र लढणार


राजस्थानमधील निवडणुकीसंदर्भात 15 डिसेंबरला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पक्ष अध्यक्ष एकनाथ शिंदे हे राजस्थानच्या नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. त्यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. इतर पक्षांतील कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात शिवसेनेत दाखल होत आहेत आणि त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत.


Rajasthan Kota Religious Conversion Case : धर्मांतरण प्रकरणावर शिंदे गटाचा इशारा 


कोटा येथे ख्रिश्चन मिशनरींकडून ‘शैतान का राज’ असे वक्तव्य करत धर्मांतरणाला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात राज्य सरकारने कारवाई न केल्यास शिवसैनिक स्वतः दोषींना धडा शिकवतील. त्यांना सार्वजनिक ठिकाणी ‘रामराज आहे’ असे म्हणायला लावू असा इशारा राजस्थानमधील शिंदे गटाने दिला आहे.


ही बातमी वाचा: