नवी दिल्ली : वरिष्ठांच्या भेटीसाठी गेलेल्या एकनाथ खडसे यांचं दिल्लीत अजिबात वजन नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण गुरुवारी दिल्लीत दाखल झालेल्या खडसेंना एकाही वरिष्ठ नेत्याने भेटही दिली नाही. त्याला अपवाद केवळ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ठरला.


 

महसूलमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, खडसे यांनी आपलं गाऱ्हाण मांडण्यासाठी दिल्ली गाठल्याची चर्चा होती. मात्र खडसेंची वरिष्ठ नेत्यांशी भेटण्याची धडपड व्यर्थ ठरली असून, खडसे पुन्हा माघारी मुंबईला परतले आहेत.

 

दिल्लीत खडसेंना एकटे नितीन गडकरीच भेटले. खडसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची शक्यता होती. मोदी कालच पाच देशांच्या दौरा आटोपून दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र ना मोदी, ना अमित शाह ना अन्य कोणताही बडा नेता खडसेंना भेटला नाही.

 

खडसेंनी केलेल्या बदल्यांची फेरतपासणी?

 

दरम्यान, इकडे महाराष्ट्रात मंत्रिपदी असताना खडसेंनी घेतलेल्या अनेक निर्णयाची फेरतपासणी केली जाणार आहे.. स्वतः मुख्यमंत्री खडसेंनी यांनी घेतलेल्या निर्णयांची पुर्नतपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. ज्यात खडसें यांच्या महूसल खात्यासहित अनेक खात्यांची धोरणं, अधिकाऱ्यांच्या बदल्या या निर्णयांचा समावेश आहे.