छोटा राजनचा 'गेम' करण्यासाठी आलेले डी कंपनीचे 4 जण अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 10 Jun 2016 03:46 AM (IST)
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची हत्या करण्याच्या प्रयत्नात आलेल्या 4 हल्लेखोरांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हे चारही हल्लेखोर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा उजवा हात छोटा शकील टोळीचे असल्याचं सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांकडून पोलिसांनी 9 एमएमच्या बंदुका आणि रोक रक्कम जप्त केली आहे. इंडोनेशियातून राजनला अटक केल्यानंतर सध्या त्याला तिहार जेलमध्ये ठेवण्यात आलंय. यानंतर डी कंपनीकडून राजनला संपवण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचं कळतंय.