वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात आणखी एक गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 21 Jan 2017 09:07 AM (IST)
मुंबई : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक आणि वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात ईडीनं नोटीस बजावली आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी मनी लॉन्डरिंग कायद्यानुसार झाकीर नाईकविरोधात ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता झाकीर नाईकच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ईडीनं पीएमएलए कायद्यानुसार झाकीर नाईकला समन्स बजावलं आहे. या नोटीसमधून झाकीर नाईकला या महिन्याअखेरपर्यंत हजर राहण्याची ताकीद दिली आहे. ईडीला झाकीर नाईकचा जबाब नोंदवायचा आहे. मात्र झाकीर नाईक सध्या परदेशात असल्यानं त्याच्याविरोधात ईडीनं समन्स बजावलं आहे. झाकीर नाईक आणि इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला यापूर्वीही अनेकवेळा समन्स बजावण्यात आलंय. तसंच दहशतवादविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.