मनी लॉड्रिंगप्रकरणी रॉबर्ड वाड्रा यांची 'ईडी'कडून उद्या पुन्हा चौकशी
एबीपी माझा वेब टीम | 29 May 2019 08:59 AM (IST)
लंडनमधील मालमत्ता खरेदी प्रकरणी मनी लॉड्रिंगचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर करण्यात आला आहे.
NEW DELHI, INDIA - FEBRUARY 7: Robert Vadra, brother-in-law of Congress President Rahul Gandhi, arrives at Enforcement Directorate office, on February 7, 2019 in New Delhi, India. He was questioned for over 2 hours at the Enforcement Directorates office in a second round of questioning in connection with a money laundering case. (Photo by Amal KS/Hindustan Times via Getty Images)
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींचे पती रॉबर्ड वाड्रा यांची मनी लॉड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून(ईडी) उद्या पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत वाड्रा यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. लंडनमधील मालमत्ता खरेदी प्रकरणी मनी लॉड्रिंगचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी देखील मनी लाँड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअरजवळ कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करताना या व्यवहारामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप वाड्रांवर ठेवण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा यांनी मात्र लंडनमध्ये आपली कोणतीही संपत्ती नसल्याचा दावा केला आहे. तसेच या व्यवहारात सहभागी असलेल्या कोणालाही आपण ओळखत नाही असं त्यांनी सांगितल्याचं बोललं जात आहे. ईडीकडून यापूर्वीही वाड्रांची चौकशी झाली आहे. अशा प्रकारे चौकशी हे आपल्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काय आहे प्रकरण ? शस्त्रास्त्रांची विक्री करणाऱ्या दलालाकडून लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वाड्रांवर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली झालेल्या एका शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणाऱ्या दलालाकडून वाड्रा यांनी लंडनमध्ये बेहिशोबी मालमत्ता खरेदी केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या खरेदी केलेल्या घराचा पत्ता 12, एलरटन हाउस, ब्रायनस्टन स्क्वेअर, लंडन असा देण्यात आला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांचे सहाय्यक मनोज आरोरा यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या मेलमध्ये अर्थिक देवाण-घेवाण आणि लंडनमधील घराच्या नुतनीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 19 पाउंड म्हणजे म्हणजे 19 कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत. हा व्यवहार ऑक्टोबर 2009 मध्ये करण्यात आला असून जून 2010 मध्ये याची विक्री करण्यात आली. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांच्या वकिलांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. तर काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी हे सर्व आरोप तथ्यहिन असल्याचे सांगितले होते.