कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत 18 जागा जिंकून मोठं यश मिळवणाऱ्या भाजपने तृणमूल काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसचे दोन आमदार आणि 50 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत.


भाजपचे माध्यम प्रभारी आणि राज्यसभेचे खासदार अनिल बलुनी म्हणाले, "बंगालच्या अनेक नेत्यांनी भाजपच्या कुटुंबात प्रवेश केला आहे. आज बंगालमधील तीन आमदार आमच्यात सामील आहेत. यात टीएमसीचे शुभ्रांशु रॉय, तुषार कांती भट्टाचार्य आणि सीपीएम आमदार देवेंद्र रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे”.

West Bengal | फोडाफोडीचं राजकारण, तृणमूलचे तीन आमदार आणि 60 नगरसेवर भाजपमध्ये | कोलकाता | ABP Majha



दरम्यान ज्याप्रमाणे लोकसभेचं मतदान बंगालमध्ये 7 टप्प्यात झालं, त्याचप्रमाणे आणखीनही बंगालमधील आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश 7 टप्प्यांमध्ये होईल, असं सूचक वक्तव्य भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केलं आहे.


पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल

टीएमसी 22

भाजप 18

काँग्रेस 2