विजय मल्ल्याची १४११ कोटींची मालमत्ता जप्त
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 03:30 AM (IST)
मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने मद्यव्यापारी विजय मल्ल्या याची आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी १४११ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या एका अधिकऱ्याने ही माहिती दिली. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये मल्ल्याच्या बँक खात्यातील ३४ कोटी रुपये, बंगळरु आणि मुंबईतील प्रत्येकी एक फ्लॅट, चेन्नईमधील ४.५ एकरचा औद्योगिक भागातील प्लॉट, २८.७५ कॉफीची बाग, यूबी सिटीमधील निवासी घर, तसेच बंगळरुमधील किंगफिशर टॉवरचा समावेश आहे. ही सर्व संपत्ती आयडीबीआय बँकेचे ९०० कोटीचे कर्ज चुकवण्यासाठी जप्त करण्यात आली आहे. मल्ल्याच्या किंगफिशर एअर लाइन्सवर विविध बँकांकडून उचललेले तब्बल नऊ हजार कोटींचे कर्ज आहे. मल्ल्याने २ मार्च रोजी ब्रिटनला पलायन केले. त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणासाठी इडीच्यावतीने भारत - ब्रिटेनमधील एमएसडी कराराचा वापर केला जात आहे.