नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले. परंतु, भूकंपाचे केंद्र व तीव्रता अद्याप कळू शकली नाही. दिल्लीत गुरुवार हा थंडीचा दिवस होता. दिल्लीत सामान्यापेक्षा तापमान 7 डिग्रीपेक्षा खाली होते. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे येथील लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत.