नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत आज भूंकपाच्या झटक्याने हादरला. भूकंपाची तीव्रता 6. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे धक्के दुपारी 4 वाजून 11 मिनिटांनी जाणवले. अफगाणिस्तानच्या हिंदकुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे केंद्र असल्याचं समजतं आहे.


भूकंप झाल्यास कोणती काळजी घ्यावी?

- तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा.

- शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा.

- तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तात्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा

- जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका.

- ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.

- शक्यतो जोरात ओरडण्याचा प्रयत्न करा.