Delhi Earthquake Reactor Scale: नवी दिल्ली : भूकंपाच्या धक्क्यांनी चीन (China) सोमवारी रात्री उशिरा हादरुन गेलं. चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती, भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होतो की, याची तीव्रता थेट भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली. सोमवारी रात्री उशीरा दिल्लीकरांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली, भूकंपाचं केंद्र नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता एवढी होती की, लोक घाबरुन आपल्या घरांच्या बाहेर पडले. 


नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं भूकंपाबाबत माहिती देताना सांगितलं की, "भूकंपाचा केंद्रबिंदू चीनच्या दक्षिणेकडील शिनजियांगमध्ये होता. भूकंपाची तीव्रता 7.2 होती. अक्षांश 40.96 आणि लांबी 78.30, तर खोली 80 किमी होती."


चीनच्या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता दिल्लीपर्यंत


चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा जोरदार भूकंप झाला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजली गेली. भूकंप इतका जोरदार होता की, त्याचे धक्के दिल्ली-एनसीआरमध्येही जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपाचे हे धक्के इतके जोरदार होते की, अनेक भागांतील लोक घाबरून घराबाहेर पडले आणि मोकळ्या जागेत जाऊन थांबले. 


चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे चीनच्या पश्चिम शिनजियांग भागातील दुर्गम भागात 7.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्सू प्रांतातील वुशू काउंटीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपानंतर अनेक वेळा आफ्टरशॉकही जाणवले. त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 पर्यंत मोजली गेली.


किर्गिस्तान-झिनजियांग सीमेवर भूकंप 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, किर्गिस्तान-झिनजियांग सीमेवर अनेक घरं कोसळली आहेत. यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर शिनजियांग रेल्वे विभागानं तात्काळ 27 गाड्या थांबण्याचा निर्णय घेतला.


तियान शान पर्वत रांगेत हा भूकंप झाल्याचं यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनं सांगितलं. गेल्या शतकातील सर्वात मोठा भूकंप हा 1978 मध्ये मंगळवारी पहाटे उत्तरेला सुमारे 200 किलोमीटर अंतरावर 7.1 तीव्रतेचा भूकंप होता. शेजारील देश किर्गिस्तान आणि कझाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.