Earthquake In India : जम्मू आणि काश्मीरमध्ये ( Jammu Kashmir) भूकंपाचा धक्का (Earthquake) बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल असल्याची नोंद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील कटरा येथून 97 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी सकाळी 5.01 वाजेच्या सुमारात भूकंपाचा झटका बसला. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार (National Centre for Seismology) ही माहिती दिली आहे. 






जम्मू आणि काश्मीरमध्ये 3.6 तीव्रतेचा भूकंप


राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरमधील कटराच्या पूर्वेपासून 97 किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी पहाटे 5.1 वाजता भूकंप झाला. महिनाभरापूर्वीही डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.


याआधीही जाणवले भूकंपाचे धक्के


काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केलवर इतकी होती. या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. रविवारी 8 जानेवारी रोजी रात्री 11.15 च्या सुमारास भूकंप झाला होता. यापूर्वी 5 जानेवारीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर इतकी नोंदवण्यात आली होती.


सुरतमध्येही जमीन हादरली


यापूर्वी 11 फेब्रुवारीला गुजरातमधील सुरतमध्ये जमीन हादरली होती. या भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्टर स्केलवर इतकी नोंदवली गेली. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. भूकंप विज्ञान संशोधनाच्या (ISR) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमध्ये जाणवलेल्ा भूकंपाची तीव्रता 3.8 रिश्ट इतकी होती.


सिक्कीममध्येही जाणवले भूकंपाचे धक्के


यापूर्वी 13 फेब्रुवारीला सिक्कीम राज्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, सिक्कीममधील युकसोम येथे पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.3 इतकी नोंदवण्यात आली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Turkey Earthquake : तुर्कीत भूकंपामुळं आत्तापर्यंत 35 हजार 418 जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती