नवी दिल्ली : दिल्लीच्या एनसीआरमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला आहे. 6.1 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. अफगणिस्तानच्या हिंदूकुशमध्ये भूकंपाचं केंद्र असून जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.


भूकंपामुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानीची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. याआधी 17 जानेवारीला अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे 6 रिश्टर स्केलचे धक्के जाणवले होते.