E Challan : ट्रॅफिक नियमांचे (Traffic Rules) उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलन कापले जाते. मात्र अनेक वेळा वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर लोकांना आपले ई-चलन निघाल्याचेही कळत नाही. जेव्हा ई-चलन भरण्याचा मेसेज येतो, तेव्हा लोकांना त्याची माहिती मिळते. जर तुम्हाला ही भीती वाटत असेल की तुमचे ई-चलन कापले गेले नाही किंवा ई-चलन अद्याप भरले गेले नाही, ते तपासण्याची सोपी प्रक्रिया जाणून घ्या.


ऑनलाइन ई-चलन माहित करुन घ्या
तुम्ही घरी बसून तुमच्या ऑनलाइन चलनाची स्थिती तपासू शकता. त्यासाठी पोलीस स्टेशन किंवा परिवहन विभागाच्या कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. ई-चलनची स्थिती तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन विभागाच्या echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.


येथे होम पेजवर, तुम्हाला ई-चलन स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. जिथे डीएल क्रमांक आणि वाहन क्रमांक टाकल्यानंतर तुमच्यासमोर ई-चलनची स्थिती दिसेल. जर No Found डायलॉग बॉक्स उघडला, तर याचा अर्थ तुमच्याकडे कोणतेही ई-चलन देय नाही.


ऑनलाइन भरा ई-चलन 
ई-चलन ऑनलाईन भरण्यासाठी, प्रथम तुम्हाला परिवहन विभागाच्या echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल जेथे DL क्रमांक आणि वाहन क्रमांक टाका. यानंतर, Get Details वर क्लिक करा, आता एक नवीन पेज उघडेल, जिथे ई-चलानचा तपशील दिला जाईल. येथे तुम्हाला Pay Now चा पर्याय दिसेल. ते निवडून, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.


ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुमचे ई-चलन कापले गेले तर ते तुम्हाला 60 दिवसांच्या आत भरावे लागेल. काही कारणास्तव ई-चलन भरले नाही, तर सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha