Nagaland Incident : नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात (Nagaland Firing) ठार झालेल्या नागरीकांच्या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. संसदेत बोलाना शाह यांनी जवानांना चुकीची ओळख पटल्याने हा सर्व प्रकार घडल्याचं म्हटलं आहे. भारत सरकार मृतांच्या नातेवाईकांबाबत संवेदना व्यक्त करत असल्याचंही म्हटलं आहे. तसंच या घटनेबाबत एक विशेष तपासणी पथक (SIT) स्थापन करणार असल्याचंही सांगतिलं.


अमित शाह यांनी संसदेत बोलताना नागालँड घटनेबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं, ते म्हणाले, ''सर्व पथकांना याबाबत सूचना देण्यात आल्या असून भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नये याची काळजी घ्यावी. तसंच गोळीबार झालेल्या वाहनातील 8 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून ही सर्व घटना चुकीची ओळख पटल्यामुळे झाली. तसंच जखमींना लगेच रुग्णालयातही नेण्यात आलं होतं.'' अमित शाह यांच्या स्पष्टीकरणावर विरोधी पक्षाचे खासदार नाराज असल्याने या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस, डीएमके, एसपी, बीएसपी आणि एनसीपीचे खासदार लोकसभेतून (Loksabha) निघून गेले.


तपासणी पथक नेमणार


या सर्व घटनेचा योग्य तपास लावण्यासाठी एक उच्चस्तर तपासणी पथक नेमणार असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. तसच हे पथ लवकरात लवकर या सर्व प्रकरणाचा तपास लावणार आहे. दरम्यान घटना घडताच राज्याचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री (Nagaland CM) यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. गृहमंत्रालयानेही मुख्य सचिव आणि DGP शी संपर्क साधला असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं.  



संबंधित बातम्या