मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारं Remdesivir हे औषध तीन महिन्यासाठी ऑऊट ऑफ स्टॉक झालं आहे. अमेरिकेने या औषधाचा संपूर्ण स्टॉक विकत घेतल्याने ही स्थिती ओढावली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर ट्रायल दरम्यान या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसले होते. Remdesivir हे औषध अमेरिकेच्या Gilead Sciences Inc या कंपनीने तयार केलं आहे. या औषधाच्या 5 लाख ट्रीटमेंट कोर्ससाठी कंपनीचा यूएस हेल्थ अँड ह्युमन सर्विसेससोबत एक करार झाला आहे.


अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं हे पाऊल 'अमेरिका फर्स्ट'चा दृष्टीकोण आहे. भारतात Remdesivir जेनेरिक व्हर्जन 'Covifor' या ब्रँड नेमसह विकली जाणार आहे. सिप्ला आणि हेटरो या दोन औषधी कंपन्यांना त्याचे उत्पादन व विपणनासाठी भारतीय औषध नियंत्रककडून परवानगी मिळाली आहे. वयस्कर आणि मुलांमध्ये संशयित किंवा पुष्टी केलेले कोविड -19 च्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डीसीजीआयने या औषधास परवानगी दिली आहे.


अमेरिकेतील गिलियाड सायन्सेस या औषध कंपनीकडे ‘रेमडेसीवीर या औषधाचे पेटंट आहे. अनेक देशातील औषध कंपन्या या औषध निर्मितीसाठी गिलियाड सायन्सेसच्या संपर्कात आहेत. रेमडेसीवीर हे औषध प्राथमिकरीत्या इबोला, सार्स या आजाराकरिता बनवलं गेलं होतं. मात्र या कंपनीने हे औषध कोरोनाबाधित गंभीर रुग्णांवर चांगलं काम करत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाच्या चाचण्यांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर तेथील औषध नियंत्रकांनी यास परवानगी दिली आहे.


अमेरिकेच्या आरोग्य विभागाने एका निवेदनात म्हटले की, अमेरिकेतील रुग्णालयांत Remdesivir चे 5 लाख ट्रीटमेंट कोर्स ठेवले आहेत. क्लिनिकल ट्रायल्ससाठी Remdesivir च्या वाटपाव्यतिरिक्त, जुलै महिन्यात Gilead कडून अंदाजानुसार जुलैमधील उत्पादनाच्या 100 टक्के (94,200 ट्रीटमेंट कोर्स), ऑगस्टमधील 90 टक्के उत्पादन (1,74,900 ट्रीटमेंट कोर्स) आणि सप्टेंबरच्या उत्पादनातील 90 टक्के (2, 32,800 ट्रीटमेंट कोर्स) घेतले आहेत.


BLOG | रेमेडिसिवीर आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन


Special Report | कोरोनिल करताना सर्व नियमांचं पालन केल्याचा रामदेवबाबांचा दावा