नवी दिल्ली : टिकटॉक बॅन केल्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रीया समोर येत आहेत. अशातच तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी टिकटॉकसह सरकारने 59 चिनी अॅपवर आणलेला बंदीचा निर्णय कसलाही विचार न करता घेतल्याचं सांगितलं आहे. नुसरत जहाँ यासंदर्भात बोलताना म्हणाल्या की, 'सरकारने ज्या चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. त्या अॅप्ससाठी त्यांनी भारतीय पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजे. कारण या अॅप्समुळे अनेक लोकांचा उदरनिर्वाह होत होता. दरम्यान, अभिनेत्री आणि खासदार असलेल्या नुसरत जहाँ यांचे टिकटॉकवर अनेक फॉलोअर्स आहेत. 'चिनी अॅप्सवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे लोकांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, जसं नोटबंदीमुळे झालं होतं', असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणाही साधला आहे.


नुसरत जहाँ बोलताना म्हणाल्या की, 'टिकटॉक माझ्यासाठी माझे चाहते आणि प्रेक्षक यांच्याशी कनेक्ट राहण्यासाठी इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणेच आहे. जर बंदीचा निर्णय राष्ट्राच्या हितासाठी घेण्यात आला असेल, तर मी सरकारच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन करते. परंतु, केंद्र सरकारचा हा निर्णय दिखावा असून कोणताही विचार न करता घेण्यात आलेला निर्णय आहे.'


भारताने घातलेल्या बंदीनंतर टिकटॉकची मदर कंपनी ByteDance ला 6 बिलियन डॉलरचं नुकसान


चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत भारताचे 20 जवान शहीद झाले. त्यानंतर भारताने चीनच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. भारतातील 59 चीनी अॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. त्यामध्ये भारतातील लोकप्रिय असलेल्या टिकटॉक अॅपचाही समावेश आहे. याबाबच चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटलं की यामुळे चीनचं मोठं नुकसान होणार आहे. ग्लोबल टाईम्सने ट्वीट केलं की, भारताने 59 चीनी अॅप पूर्णपणे बॅन केले आहेत. भारत सरकारच्या या निर्णयामुळे चीनी इंटरनेट कंपनी ByteDance जी टिकटॉकची मदर कंपनी आहे, तिला 6 बिलियन डॉलरचं नुकसान होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भारत सरकारने भारत-चीन तणावानंतर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत टिकटॉक(TikTok) आणि युसी ब्राउझर (UC Browser) सह 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, 'हे अॅप्स सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहेत. सरकारने जे अॅप्स ब्लॉक केले आहेत, त्यामध्ये टिकटॉक (TikTok), शेयरइट (Shareit), यूसी ब्राउजर (UC Browser), हॅलो (Helo), लाइकी (Likee), क्लब फॅक्ट्री (Club Factory) या अॅप्सचा मुख्यकरून समावेश आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


पोस्टमॉर्टमनंतर सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा रिपोर्टही आला; मृत्यूबाबत 'हा' खुलासा


इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल


आमीर खानच्या टीममधील 7 जणांना कोरोना; आईचा कोरोना अहवालही आला समोर