नवी दिल्ली : लहान मुलं मागे बसलेली असताना दुचाकी 40 किमीपेक्षा जास्त वेगानं चालवण्यास मनाई असेल. जर दुचाकीचा वेग 40 किमीपेक्षा वाढला तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन समजलं जाईल, असा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तयार केला आहे. याच प्रस्तावात 9 महिने ते 4 वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हेल्मेट घातलं गेलं पाहिजे, याची चालकानं नोंद घ्यावी अशी तरतूदही करण्यात आली आहे. केंद्रीय मोटर वाहन नियमावलीतील नव्या तरतुदींसह केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयानं पारित केला आहे. 


वाहनांसाठी नव्या नियमांचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयानं तयार केला आहे. यामध्ये मुलं मागे बसलेली असताना दुचाकी 40 किमीपेक्षा जास्त वेगानं चालवण्यास मनाई असणार आहे. तर, दुचाकीचा वेग 40 किमीपेक्षा वाढला तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन समजलं जाईल. अशी तरतुद या प्रस्तावात आहे. तसेच चार वर्षापर्यंतच्या मुलांच्या संरक्षणासाठी संरक्षण कवच आवश्यक आहे. त्यासाठी लहान मुलांना क्रॅश हेल्मेट घालणे आवश्यक आहे. 


वाहतुकीच्या नियमानुसार जर चार वर्षापेक्षा जास्त वयाचा मुलं गाडीवर बसले तर  त्याला प्रवासी मानले जाणार आहे. जर एक किंवा दोनजणांसोबत मुलं बसले असेल तर त्याला दंड आकारण्यात येईल. जर या नियमांचे उल्लंघन केले तर 1000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. याशिवाय जर एक व्यक्ती आणि  लहान मुलं  मागे बसले असेल तर त्याला त्याच्या संरक्षणाची पूर्ण काळजी घ्यावी लागेल, अन्यथा त्याला नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात येईल.


अपघातात लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार 2019 साली रस्ते अपघातात 11,168 मुलांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दिवसाला 31 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 2018 सालच्या तुलनेत रस्ते अपघातात मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात 11.94 टक्के म्हणजे 1,191 एवढी वाढ झाली आहे. 


संबंधित बातम्या :


हरित वायूच्या उत्सर्जनात 149 टक्यांची विक्रमी वाढ, जगाची चिंता वाढली; WMO च्या अहवालातून स्पष्ट


दिवाळी, पेरणी की देणेदारी.. सोयाबीन दरात घसरण झाल्याने सणासुदीच्या तोंडावर शेतकरी चिंतेत