Rural areas expenses : अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील लोक देखील मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसत आहेत. शहरी भागातील लोकांचा मोठा खर्च होतो असं बोललं जातं, हे खरं आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक देखील शहरी भागातील लोकांच्या पटीत खर्च करताना दिसत आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक किती पैसे खर्च करतात याबाबतची माहिती पाहुयात.
आत्तापर्यंत इतर गोष्टींवर खेड्यापाड्याच्या तुलनेत शहरात जास्त खर्च होत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं लोक गावापेक्षा शहरात जास्त खर्च करतात. तुम्हीही आत्तापर्यंत असाच विचार करत असाल तर ‘हाउसहोल्ड कंजप्शन एक्सपेंडिचर -2023-24’च्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. या अहवालात गाव आणि शहर यामधील सरासरी मासिक खर्चातील तफावत कमी झाल्याचे समोर आले आहे. शहरी भागात ज्या प्रमाणे लोक खर्च करतात, अलिकडे त्याच प्रमाणात गावाकडील लोक देखील खर्च करताना दिसत आहेत.
ग्रामीण स्तरावर दरडोई मासिक उपभोग खर्च 2023-24 मध्ये 4122 रुपये
ग्रामीण स्तरावर दरडोई मासिक उपभोग खर्च 2023-24 मध्ये 4,122 रुपये झाला आहे. जो 2022-23 मध्ये 3,773 रुपयांवरून 9.3 टक्क्यांनी वाढला आहे. 2011-12 मध्ये तो 1,430 रुपये होता. एका वर्षाच्या कालावधीत ग्रामीण खर्चातील ही वाढ 6,996 रुपयांच्या दरडोई शहरी सरासरी मासिक खर्चापेक्षा जास्त होती. जी 2022-23 मधील 6,459 रुपयांपेक्षा 8.3 टक्के जास्त आहे. 2011-12 मध्ये शहरी सरासरी मासिक दरडोई उपभोग खर्च (MPCE) 2,630 रुपये प्रति व्यक्ती होता.
गावकरीही खर्चात आघाडीवर
ग्रामीण आणि शहरी कुटुंबांमधील सरासरी मासिक उपभोग खर्चातील फरक 2023-24 मध्ये 69.7 टक्के झाला आहे. जो 11 वर्षांपूर्वी 2022-23 मध्ये 71.2 टक्के आणि 2011-12 मध्ये 83.9 टक्के होता. यावरुन असे दिसते की शहरी लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भारतात खर्चाचा वेग वाढला आहे, ज्यामुळे त्याचा वापर कमी होताना दिसत आहे.
भारतीयांचा खर्च वाढला
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील व्यक्तीच्या अन्नावरील खर्चाचा वाटा 2023-24 मध्ये वाढला आहे. सरासरी मासिक दरडोई खर्च (MPCE) किंवा अन्नावरील व्यक्तीचा सरासरी खर्च 2022-23 मध्ये 46.38 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये वाढून 47.04 टक्के झाला आहे. शहरी कुटुंबांचा अन्नावरील खर्च गेल्या वर्षीच्या 39.17 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 39.68 टक्के झाला आहे. गावाकडील लोक अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना दिसत आहेत. शहरी लोकांच्या बरोबर पैसा खर्च होताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या: