नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन 'गगनयान' मोहीमेची घोषणा केली. या मोहीमेअंतर्गत भारत स्वदेशी अंतराळयानाद्वारे मानवाला 2022 मध्ये अंतराळात पाठवणार आहे. पंतप्रधानांच्या या ड्रीम प्रोजेक्टची जबाबदारी आता एका महिलेच्या हातात आहे.
इस्रोच्या या 'गगनयान' प्रोजेक्टचं नेतृत्त्व डॉ. व्हीआर ललिथंबिका करणार आहेत. 'गगनयान' मोहीम 2022 आता एका महिलेच्या नेतृत्त्वात होणार आहे, जी एक मोठी बाब आहे.
डॉ. ललिथंबिका कंट्रोल रॉकेट इंजिनिअर असून मागील 30 वर्षांपासून इस्रोमध्येच कार्यरत आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, अशाप्रकारच्या मोहीमेसाठी त्या सर्वात योग्य व्यक्ती आहेत.
अॅडव्हान्स लॉन्चर टेक्नॉलॉजिज तज्ज्ञ ललिथंबिका आगामी काही दिवसात आपल्या टीमची निवड करणार असून दोन महिन्यांच्या आत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट सोपवणार आहेत.
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर इस्रोने या निर्णयाचं स्वागत केलं होतं. "ही देशासाठी मोठी घोषणा आहे. या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा हजार कोटी रुपये लागणार आहेत," असं इस्रोचे संचालक के. शिवन यांनी या मोहीमेबद्दल सांगितलं.
जर 2022 मध्ये भारताची मोहीम यशस्वी झाली तर असं करणारा हा चौथा देश आहे. याआधी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीनने आपल्या अंतराळवीरांना स्वत:च्या यानातून अंतराळात पाठवलं होतं.
'या' महिला वैज्ञानिकाकडे 'गगनयान' मोहीमेची जबाबदारी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Aug 2018 12:18 PM (IST)
अॅडव्हान्स लॉन्चर टेक्नॉलॉजिज तज्ज्ञ ललिथंबिका आगामी काही दिवसात आपल्या टीमची निवड करणार असून दोन महिन्यांच्या आत पहिला प्रोजेक्ट रिपोर्ट सोपवणार आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -