रायपूर : तेलंगणामधील युवा कृषी शास्त्रज्ञ डॉ. नुनावथ अश्विनी यांचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्याचा मृतदेह हाती लागला असून त्यांचे वडील अद्याप बेपत्ता आहेत.  डॉ. अश्विनी या रायपूरमधील आयसीएआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या. तेलंगणामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी मोठा पूर आला आहे. डॉ. अश्विनी आणि त्यांचे वडील हे हैदराबाद विमानतळाकडे जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. 


डॉ. अश्विनी आणि त्यांचे वडील नुनावत मोतीलाल हे तेलंगणामधील खम्मम जिल्ह्यातील सिंगरेनी मंडलमधील गंगाराम थांना गावचे निवासी आहेत. ते हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जात होते. त्याचवेळी मरीपेडाजवळ आल्यानंतर त्यांची कार पुरातून वाहून गेली. नदीच्या पुलावर पाणी भरले असताना ही घटना घडली. 


 






नदीच्या पुलावर गेल्यानंतर डॉ. अश्विनी यांच्या कारमध्ये पाणी भरू लागले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही. त्यावेळी डॉ. अश्विनी यांनी त्यांच्या कुटुंबीयांना शेटवचा कॉल केला होता. त्यानंतर त्यांचा कॉल अचानक बंद झाला. डॉ. अश्विनी यांची कार पुराच्या पाण्यात वाहून गेली. 


त्यानंतर बचाव पथकाने शोध मोहीम सुरू केली असता अकरुवागू पुलापाशी डॉ. अश्विनी यांचा मृतदेह सापडला. पण त्यांच्या वडिलांचा मृतदेह अद्याप सापडला नाही. 


 




ही बातमी वाचा: