मुंबई : एखाद्या उपवर मुलाचा हुंडा किती असावा, याची मोजदाद करणारी वेबसाईट आज वादात सापडली आहे. कारण कायद्याने बंदी असलेल्या हुंड्याला प्रोत्साहन देणाऱ्या या वेबसाईटवर निर्मिती कऱण्यात आली आहे. काँग्रेसने या वेबसाईटवर कारवाईची मागणी केली आहे.
www.dowrycalculator.com या वेबसाईटवर सध्या नेटिझन्सच्या उड्या पडत आहेत. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची तक्रार काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली आहे. महिला बाल कल्याण मंत्री मनेका गांधी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद या दोन्ही नेत्यांना काँग्रेसने पत्र लिहिलं आहे.
दरम्यान ही वेबसाईट मनोरंजनाचं साधन असून, त्याचा गैर अर्थ घेऊ नये, असा युक्तीवाद या वेबसाईटच्या निर्मात्यांनी केला आहे. असं असलं, तरी या वेबसाईटवरुन राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे.