नवी दिल्ली : भारतात कोरोना बाधित रग्ण वाढण्याचा दर आज सर्वात कमी नोंदवण्यात आला. शनिवारी देशभरात फक्त 100 नवे कोरोनाबाधित सापडल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे. देशातला कोरोनाबाधित रुग्ण डबल होण्याचं प्रमाणही आता तब्बल 9.1 दिवसांवर आलंय. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचा दर हा फक्त सहा टक्के एवढाच नोंदवण्यात आला. कारण शनिवारी सकाळी संपलेल्या 8 तासात फक्त 100 नवे रुग्ण सापडले.


सध्या देशभरातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 25 हजारांपर्यंत पोहोचला आहे. अगदी नेमकी आकडेवारी द्यायची तर 24942 ही आजची देशातली कोरोना व्हायरस पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. तसंच 779 रुग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येतून बरे झालेल्या म्हणजेच कोरोनामुक्त होऊन घरी पाठवण्यात आलेल्यांचा आकडा 5209 आहे. बरे झालेले आणि मृत झालेले यांची संख्या एकूण लागण झालेल्यांच्या संख्येतून वगळली तर सध्या देशात 18953 उपचार घेत असलेले कोरोनाबाधित आहेत.



लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही; राजेश टोपे यांच्याकडून स्पष्ट


केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली कोविड 19 बाबत वरिष्ठ मंत्रिस्तरीय गटाची बैठक आज राजधानीत झाली. आजच्या बैठकीत उच्चस्तरीय मंत्री गटाने वेगवेगळ्या राज्यातल्या कोरोना सज्जतेचा आढावा घेतला, एकूण कोविड स्पेशल हॉस्पिटलची संख्या, पीपीई सूट, मास्क, औषधे तसंच व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सिलेंडर्स यांच्या साठ्याविषयीही मंत्रीगटाने आढावा घेतला.


Coronavirus | पोलीस बाप ड्युटीवर, नवजात बाळाचं लांबूनच दर्शन, खबरदारीसाठी कुशीतही घेऊ शकत नाही!


देशातच अनेक वैद्यकीय साहित्याची निर्मिती
देशभरात सध्या शंभरपेक्षा जास्त उद्योजकांकडून स्वदेशी पीपीई सूटची निर्मिती केली जात आहे. तर N95 मास्क बनवणारे देशात फक्त तीन उत्पादक आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईतील शस्त्रसज्जता म्हणून देशांतर्गत उत्पादित झालेल्या व्हेंटिलेटर्सला प्राधान्य दिलं जात असल्याचं मंत्रीगटाला सांगण्यात आलं. देशातल्या 9 व्हेटिंलेटर्स उत्पादकांकडे तब्बल 59 हजार व्हेंटिलेटर्स युनिटची मागणी नोंदवण्यात आली आहे.


केंद्राचा सुधारित आदेश | देशात आजपासून अटींसह 'ही' दुकानं उघडण्याची सूट


मृत्यूदर स्थिर, तर रिकव्हर होण्याचा दर वाढला
कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर सध्या 3.1 वर स्थिर असल्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. तसंच कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचंही या बैठकीत सांगण्यात आलं. हा दर जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत समाधानकारक असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. कोविड 19 साठी गठित करण्यात आलेल्या या उच्चरस्तरीय मंत्रीगटात हवाई वाहचूक मंत्री हरदीप पुरी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, गृहराज्यमंत्री नित्यानंद राय, जलवाहतूक तसंच खते आणि रसायन मंत्री मनसुख मंडाविया या ज्येष्ठ मंत्र्यांची आजच्या बैठकीला उपस्थिती होती.


Maharashtra Lockdown | सलून आणि पार्लर असोसिएशनच्या अध्यक्षांची व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी