नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दिल्लीतील तीन मूर्ती स्मारकात  केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या वास्तूंमध्ये बदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.


दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी मोदी यांना पत्र लिहिले आहे.

माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे केवळ काँग्रेसचे नेते नव्हते तर ते संपूर्ण देशाचे नेते होते, असं सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे.

तुमचं सरकार एका अजेंड्यानुसार नेहरु मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी यांची रचना बदलण्याच्या तयारीत आहे. मात्र तुमच्याकडून अपेक्षा आहे की ते होऊ देऊ नये, असं मनमोहन सिंह यांनी पत्रात नमूद केलं.

शिवाय आपल्या पत्रात मनमोहन सिंहांनी वाजपेयींच्या त्या भाषणाचा उल्लेख केला आहे, ज्यात नेहरुंच्या निधानंतर लोकसभेतील भाषणात वाजपेयींनी नेहरुंच्या कार्याचा गौरव केला होता.