डॉ. बैजू हे वैद्यकीय अधिकारी म्हणून तामिळनाडूतील सरकारी रुग्णालयात कार्यरत होते. जानेवारी 2007 मध्ये हाडांशी संबंधित समस्येतून एक महिला त्यांच्याकडे आली. डॉ. बैजू यांनी प्रिस्क्राईब केलेले औषध घेतल्यानंतर ती बेशुद्ध पडली.
महिलेच्या कुटुंबीयांनी याची माहिती डॉक्टरांना दिली. त्यानंतर कशायम हे त्यांनी लिहून दिलेले आयुर्वेदिक औषध घेऊन येण्यास डॉ. बैजू यांनी कुटुंबीयांना सांगितलं. संबंधित औषध अपायकारक नसल्याचं पटवून देण्यासाठी डॉक्टरांनी ते चाखलं. त्यानंतर ते कोमात गेले.
नऊ वर्षांनंतर आज डॉ. बैजू यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह ऑटोप्सीसाठी मुवत्तुपुझामधील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.